ArogyaMitra announces Novel services on World Health Day. 


Vaccination reminder service started on 15th August 2010 has received good response from medical professionals. 200 doctors, hospitals and NGO's from various cities have registered on www.arogyamitra.com and entered birth dates and mobile numbers on the website. Every day 5 to 10 children are getting benefit of these free service. In order to increase outreach of the service to many more children, HITECH Medical Informational Services have made novel arrangements.
 
Parents of children born after 2009 are requested to send by SMS: AROGYA (space) VACC to +919405104510. Arogyamitra will collect birth date and name etc information and send reminder to take vaccine as per schedule given by Indian Academy of Paediatrics.
 
Similarly pregnant women are requested to send by SMS: AROGYA (space) PREG to +919405104510. Arogyamitra team will collect date of last menstrual period, name etc details and send reminders to visit their doctors as per schedule given by Obstericians and gynecologists.
 
Doctors who wish to send reminder SMS to their patients are requested to send by SMS: AROGYA (space) DOCT to +919405104510 and Arogyamitra team will give them details of the service.
 

Since timely vaccination will reduce diseases in children and since timely visits to gynecologists will help birth of healthy child, HITECH is giving these services absolutely free of cost. 

 
 

१५ ऑगस्ट २०१० रोजी सुरु केलेल्या लसीकरणाच्या आठवणीच्या एस एम एस सेवेला वैद्यकीय व्यावसायिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून भारतातील निरनिराळ्या शहरांमधील २०० डॉक्टर्स, रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्याकडे येणार्‍या बालकांची नोंदwww.arogyamitra.com या संकेतस्थळावर केली. दररोज ५ ते १० बालकांना या मोफत सेवेचा लाभ होत आहे. आणखी जास्त रुग्णांना या सेवेचा लाभ मिळावा या हेतूने हायटेक मेडिकल इन्फॉर्मेशनल सर्विसेस या संस्थेने अभिनव योजना आखली आहे. 

२००९ नंतर जन्म झालेल्या बालकांच्या पालकांनी AROGYA (space) VACC असा एस एम एस +919405104510 या क्रमांकावर पाठवावा. आरोग्यमित्र तर्फे त्यांच्याकडून जन्मतारीख, नाव वगैरे माहिती घेतली जाईल आणि भारतीय बालरोगतज्ञांच्या संघटनेने तयार केलेल्या कोष्टकाप्रमाणे ज्या दिवशी लसीकरण करणे आवश्यक आहे त्यादिवशी सकाळी पालकांच्या मोबाईल क्रमांकावर एस एम एस पाठवला जाईल. 

याच पध्दतीने ज्या महिलांना दिवस राहिले आहेत त्यांनी AROGYA (space) PREG असा एस एम एस +919405104510 या क्रमांकावर पाठवावा. आरोग्यमित्र तर्फे त्यांच्याकडून शेवटच्या पाळीची तारीख, नाव वगैरे माहिती घेतली जाईल आणि स्त्रीरोग तज्ञांच्या कोष्टकानुसार ज्या दिवशी डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे त्या दिवशी सकाळी एस एम एस पाठवला जाईल. 

ज्या डॉक्टरांना त्यांच्या रुग्णांना अश्या प्रकारे आठवणीचा एस एम एस पाठवायचा असेल त्यांनी AROGYA (space) DOCT असा एस एम एस +919405104510 या क्रमांकावर पाठवावा. आरोग्यमित्रचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टरांना आधिक माहिती देतील. 

वेळेवर लसीकरण केल्याने बालकांमधील आजाराचे प्रमाण कमी होईल, तसेच वेळच्या वेळी स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेतल्याने निरोगी बाळाची सुखरुप प्रसूती होण्यास मदत होईल, या विचाराने संस्थेतर्फे ही सेवा संपूर्णपणे मोफत देण्यात येत आहे. 

 

 

© 2010, HITECH MIS Pvt Ltd, 1416 Sadashiv Peth, Pune 411 030, India. 

 
Make a Free Website with Yola.